Breaking News

पार्थ यांना पाहताच अजित पवार निघून गेले

पिंपरी : प्रतिनिधी

मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पिंपरीत कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, पण या ठिकाणी पोहोचण्यात पार्थ यांना तब्बल दीड तास उशीर झाला. पार्थ हे जेव्हा मेळाव्यास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना पाहून राष्ट्रवादीचे नेते व पार्थ यांचे वडील अजित पवार तिथून निघून गेले. त्यामुळे चर्चांना उधाण आले.

पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ शिवक्रांती कामगार संघटनेने रविवारी (दि. 31) पिंपरी येथे कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यांनी भाषण केले, मात्र उमेदवार असलेले पार्थ नियोजित वेळेपक्षा दीड तास उशिराने मेळाव्यात पोहोचले. त्यामुळे वैतागलेले अजित पवार हे त्यांच्याशी काहीही न बोलता निघून गेले.

दरम्यान, उशिरा आलेल्या पार्थ पवारांनी भाषण करणे टाळले. याबद्दल विचारले असता, अजितदादांनी जे विचार मांडले तेच माझे विचार, असा युक्तिवाद करून त्यांनी वेळ मारून नेली, मात्र कार्यकर्ते जे समजायचे ते समजून गेले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply