Breaking News

सुनील तटकरे सांगा कोणाचे?

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे नक्की कोणत्या पक्षात आहेत, अशी चर्चा सध्या अलिबाग शहरात रंगली आहे.

सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ अलिबाग तालुक्यात आतापर्यंत तीन सभा झाल्या. त्यातील दोन सभा शेकापने पुढाकार घेऊन आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक शेकाप कार्यकर्त्यांसाठी होती. दुसरी उमेदवारी अर्ज भरतानाची होती; तर काँग्रेसने एक सभा आयोजित केली होती ती काँग्रेस भवनमध्ये. आता तटकरेंचे भलेमोठे होर्डिंग शेतकरी भवनवर लागले आहे, मात्र अलिबाग शहारातच असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रसच्या कार्यालयात अजनूही तटकरेंच्या प्रचाराचा बॅनर लागलेला नाही.

लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच सुनील तटकरेंचे बॅनर सगळीकडे झळकत होते. त्यातील एक बॅनरदेखील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या परिसरात झळकला नाही. अलिबाग तालुक्यात राष्ट्रवादीने अद्याप सुनील तटकरे यांची सभासुद्धा आयोजित केलेली नाही. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रवादीचे, तसेच शेकापचे झेंडे लागले आहेत.

दोन महिन्यांपूर्वी सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद अलिबाग तालुक्यात घेतली ती शेतकरी भवनमध्ये. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रचार यंत्रणा राबवली ती शेकापनेच. त्यामुळे तटकरे शेकापचे की राष्ट्रवादीचे, अशी चर्चा अलिबागेत सुरू आहे.

Check Also

आमदार महेश बालदी यांना मातृशोक

गंगादेवी बालदी यांचे निधन उरण ः रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री …

Leave a Reply