मुंबई : वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोव्यातून येणार्या प्रवाशांना निगेटिव्ह आरटी-पीसीआर चाचणी अहवाल अनिवार्य करण्यात आले आहे. रस्ते महामार्गाने येणार्या प्रवाशांचा 96 तास आधी, तर विमानाने येणार्या प्रवाशांचा 72 तासांपूर्वी अहवाल निगेटिव्ह येणे बंधनकारक आहे. चार राज्यांतील महाराष्ट्रात येणार्या ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील त्यांची अँटीजेन चाचणी केली जाईल. प्रवासी पॉझिटिव्ह आढळला तर त्याला कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. उपचाराचा खर्च त्यालाच करावा लागेल, असेही राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …