Breaking News

वीज बिल कमी करण्यासाठी राज्य सरकारविरोधात मनसेचा मोर्चा

मोहोपाडा : प्रतिनिधी

गेले आठ महिने जनता लॉकडाऊनमुळे घरीच अडकलेली असताना आणि आमदनी रूपयाचीही कमाई नसताना राज्य सरकारने लोकांना लॉकडाऊन काळात आलेल्या विज बीलात कोणतीही सवलत मिळणार नाही हे जाहीर केले आणि महाराष्ट्रात असंतोषाचा भडका उडाला. लॉकडाऊन काळात लोकांसाठी रस्त्यावर उतरणार्‍या मनसेने याविरोधात एल्गार पुकारला आणि 26 नोव्हेंबर रोजी राज्यभरातल्या जिल्हाधिकारी कार्यालये आणि प्रांत कार्यालयांवर महामोर्चे आयोजित केले.

याचाच भाग म्हणुन पनवेल मनसेनेही मनसे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, पनवेल तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ यांच्या नेतृत्वाखाली, मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीश सावंत, जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, उपजिल्हाध्यक्ष अतुल चव्हाण, अक्षय काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर अध्यक्ष पराग बालड, शितल शिलकर, प्रसाद परब, अमोल बोचरे, रोहित दुधवडकर, वाहतुक सेनेचे उपाध्यक्ष राजकुमार पाटील, प्रविण दळवी, राहुल चव्हाण, उरण सचिव विजय तांडेल उपजिल्हा अध्यक्ष दीपक कांबळी उरणचे संदेश ठाकूर व इतर सर्व मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि त्रस्त जनता यांच्या सहकार्याने प्रांत कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.

प्रचंड पोलीस बंदोबस्त असताना निघालेला हा महामोर्चा पाहून तरी लोकांच्या भावना सरकारपर्यंत नक्कीच पोहचतील आणि सरकार विज सवलतीचा विचार करेल, अशी आशा या वेळी पनवेल मनसे तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ यांनी व्यक्त केली आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply