Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्वखर्चातून कानपोलीत महिला मंडळासाठी हॉल

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास गावाचा विकास होईल, असे प्रतिपादन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी बुधवारी (दि. 19) कानपोली येथे केले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात अनेक विकासकामे सुरू आहेत. त्या अंतर्गत कानपोली गावात त्यांच्या स्वखर्चातून महिला ग्राम संघ मंडळासाठी हॉल बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
कानपोली गावात बांधण्यात येणार्‍या हॉलच्या भूमिपूजन कार्यक्रमास भाजप नेते एकनाथ देशेकर, पं. स. सदस्य तथा भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, माजी पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमलाताई देशेकर, कानपोली ग्रामपंचायतीच्या सदस्य संगीता पाटील, बाळकृष्ण पाटील, आत्माराम खानावकर, बाबुराव पाटील, परशुराम पाटील, मधुकर पाटील, लक्ष्मण मते, आत्माराम पाटील, अंबो पाटील, निवृत्ती पाटील, सावळाराम मते, गोमा पाटील, अंकुश जोशी, अरुण पाटील, राम चौधरी, राधेशाम चव्हाण, दिनेश पाटील, प्रदीप मते, संतोष पाटील, अक्षय पाटील, राम पाटील, विराज पाटील, रोहित पाटील, प्रल्हाद साळुंखे, हनुमान साळुंखे, शोभा मते, सुरेखा जोशी, धर्मा निरगुडा, शोभा भला यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, या वेळी भाजप नेते एकनाथ देशेकर यांच्या माध्यमातून कानपोली गावात दिवाळी सणानिमित्त उटण्याचे वाटप करण्यात आले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply