Breaking News

26/11च्या हल्ल्यातील शहिदांना पनवेल पोलिसांकडून आदरांजली

पनवेल : वार्ताहर

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि दहशतवाद्यांशी दोन हात करून आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सर्वांना विनम्र आदरांजली गुरुवारी (दि. 26) पनवेल शहर पोलिसांनी वाहिली.

मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री समुद्रमार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. त्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यामध्ये अधिकार्‍यांसह शेकडो निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर अनेक जण जखमी झाले होते. या सर्वांना पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी विनम्र आदरांजली वाहिली आहे. या वेळी संपूर्ण पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply