Breaking News

भाजप पनवेल शहर सांस्कृतिक सेलची कार्यकारिणी जाहीर

परेश ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त – भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेलची पनवेल शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली  आहे. त्या अनुषंगाने नियुक्ती पत्रप्रदान सोहळ्याचे आयोजन गुरुवारी (दि. 26) करण्यात आले होते. त्यानुसार सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नियुक्तीपत्र प्रदान करून शुभेच्छा देण्यात आल्या.

भाजप सांस्कृतिक सेल पनवेल शहर मंडलची कार्यकारिणी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक सेलचे शहर संयोजक अभिषेक पटवर्धन यांनी जाहीर केली. यामध्ये सहसंयोजकपदी गणेश जगताप, संजीव कुलकर्णी, सदस्य म्हणून अमोल खेर, अथर्व गोखले, निखिल गोरे, आदित्य पुंडे, श्रीरंग केतकर, मुग्धा दातार, श्वेता कुलकर्णी, साईचंद्र निकाळजे, वैभव बुवा, यामिनी दामले यांचा समावेश आहे. या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आणि सदस्यांना पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या.

या वेळी बोलताना परेश ठाकूर यांनी, भारतीय जनता पक्षाचा विचार, ध्येय धोरणे तसेच मूलभूत योजना ही सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणे तसेच सांस्कृतिक सेलच्या मार्फत नाट्य-कला क्षेत्रातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी व भाजपचा विचार हा समाजात रूजविण्यासाठी आमची ही टीम सतत कार्यरत असेल, असे सांगितले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply