उरण : रामप्रहर वृत्त
उरण तालुक्यातील पाणजे ग्रामपंचायतीला शासनाच्या आर आर (आबा पाटील) सुंदर गाव पुरस्कार योजनेच्या 2019/20 या वर्षा अंतर्गत तालुका स्तरावरून प्रथम पुरस्कार मिळाला आहे. त्यानिमित्त भाजपच्या पाणजे ग्रामपंचायतीच्या सरपंच करिष्मा भोईर, उपसरपंच नम्रता पाटील वा ग्रामपंचायत सदस्यांचे आमदार महेश बालदी, भाजप युवामोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील आणि तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन प्रशिक्षण शिबिरावेळी अभिनंदन करण्यात आले.
या वेळी उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयवंत कोळी, तालुका अध्यक्ष रवि भोईर, महिला मोर्चा उरण तालुकाध्यक्षा राणी म्हात्रे, सुधिर घरत, शेखर पाटील, मच्छिंद्र पाटील, उरण शहर सरचिटणीस सुनिल पाटील, हरेश्वर भोईर आदी उपस्थित होते.