Breaking News

मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला

उदयनराजेंचे टीकास्त्र

सातारा : प्रतिनिधी

आधीच्या पिढीतल्या लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला. कधीपर्यंत समाजाचा अंत पाहणार आहात. आरक्षणाचा प्रश्न सोडवावा; अन्यथा फार मोठा अनर्थ होईल आणि त्याला जबाबदार ही सगळी मंडळी असतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, आता कुबट वास यायला लागला आहे. छत्रपतींचे नाव घ्यायचे आणि राजकीय दृष्टिकोन ठेवून एखाद्या समाजाला दाबायचे काम केले जात आहे. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. प्रश्न सोडवता येत नसेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा.

इतरांचे आरक्षण कमी करून आम्ही आरक्षण मागत नाही. सर्वधर्मसमभाव अशी भूमिका छत्रपतींची आहे. आता जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. इतर कुठल्याही समाजावर अन्याय झाला तरी आम्ही त्यांचीही बाजू तितक्याच तीव्रतेने मांडू, असेही खासदार उदयनराजे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, या प्रश्नाच्या मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत मराठा आरक्षण निर्णय मार्गी लागणार नाही. आता पुढची पिढी विचारेल तुम्ही काय केले? प्रत्येकाला आरक्षण दिले. मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही? देवेंद्र फडणवीस आपल्याच वयाचे आहे. त्यांनी आरक्षणासाठी काम केले. आता तुम्ही सत्तेत आहात, मग काम करा ना, असेही उदयनराजेंनी सुनावले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply