कळंबोली : कळंबोली-रोडपाली येथील खेळाडूंसाठी असलेले मैदान खेळण्याजोगे राहिले नव्हते. या मैदानावर कचरा, मातीचे ढिगारे पडले असल्याने खेळाडूंनी याबाबत स्थानिक नगरसेवक अमर पाटील यांचे लक्ष वेधले. पाटील यांनी ही बाब सभागृह नेते परेश ठाकूर यांना सांगताच त्यांनी तत्परतेने पाहणी करून मैदान विकसित करण्याचे आश्वासन दिले. या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टीही उपस्थित होते. परेश ठाकूर यांच्यामुळे खांदा कॉलनीपाठोपाठ आता कळंबोलीकरांनाही सुंदर असे खेळाचे मैदान उपलब्ध होणार आहे.


