Breaking News

हुतात्मा भाई कोतवाल यांना माथेरानमध्ये अभिवादन

कर्जत : बातमीदार

वीर हुतात्मा भाई कोतवाल यांची 108 वी जयंती  मंगळवारी (दि. 1) माथेरानमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी वीर भाई कोतवाल यांना अभिवादन करण्यासाठी माथेरानकरांनी हुतात्मास्मारक येथून सकाळी मशाल फेरी काढली होती. त्यांच्या जन्मस्थळी हुतात्मा भाई कोतवाल विचारमंच तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून अभिवादन कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.

या वेळी हुतात्मा स्मारक येथे वीर भाई कोतवालांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मुख्य कार्यक्रमाची सुरूवात करताना नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते क्रांतिज्योत  प्रज्वलनासह शहरातून मशाल फेरी काढण्यात आली.हुतात्म्यांच्या नामफलकास कोतवालांच्या सुनबाई मेघा कोतवाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. माधवजी उद्यानातील कोतवालांच्या अर्धपुतळ्यास वीर भाई कोतवाल ब्रिगेडचे अध्यक्ष रोहिदास क्षीरसागर तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या स्तंभास अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

हुतात्मा वीर भाई कोतवाल विचारमंचाच्या कार्यकर्त्यांनी देखील हुतात्मा कोतवाल यांना अभिवादन केले. माधवजी उद्यानात वीर भाई कोतवाल यांच्या अर्धपुतळ्यास सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी तर स्वातंत्र्यसैनिकांच्या स्तंभास माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक विजय कदम यांच्या हस्ते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

वीर भाई कोतवालांनी देशाप्रती केलेले महान कार्य व त्यांचे बलिदान प्रेरणादायी रहावे, यासाठी हुतात्मा कोतवाल यांचा धडा इंग्रजी व मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात असावा, आशा स्वरूपाच्या विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply