Breaking News

खालापुरात अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार

आरोपीला तात्काळ अटक करावे; आदिवासी संघटनेची मागणी

खालापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील कुंभिवली आदिवासी वाडीतील एका  अल्पवयीन आदिवासी मुलीवर अज्ञात इसमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी  खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून आरोपीना तात्काळ अटक करावी, अशा मागणी आदिवासी संघटनेने खालापूर तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे  केली आहे.

कुंभिवली आदिवासी वाडीतील पीडित मुलगी कपडे धुण्यासाठी पाताळगंगा नदीवर जात होती. त्यावेळी सावरोली-खारपाडा मार्गावर मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी इसमाने आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार पीडित अल्पवयीन मुलीने खालापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेनंतर सदरचा इसम मोटरसायकल घेऊन फरार झाला असून, तो परप्रांतीय असल्याची चर्चा आहे.

 उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस सीसीटीव्ही फुटेज व अन्य माहितीच्या आधारे या फरार नराधमाचा शोध घेत आहेत. रायगडचे पोलीस अधिक्षक अशोक दुधे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी घटनास्थळी भेट देऊन लवकरच आरोपीला  अटक करून कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन  आदिवासी समाज बांधवांना दिले.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला त्वरीत अटक करावी, अशी मागणी आदिवासी संघटनेने खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दत्तू वाघ, नगराध्यक्षा रेणुका पवार, दीपक डाके, मारुती पवार, सदस्य भीमा वाघमारे, काशिनाथ जगताप, लक्ष्मण वाघमारे, रेणुका पवार, संतोष जाधव, जी. एस. वाघमारे, अंकुश वाघ आदी समाज बांधव उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

मालमत्ता करावरील शास्ती माफ -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त फोरम, फेडरेशन यांच्या दिशाभूलीमुळे …

Leave a Reply