Breaking News

कसोटी क्रिकेटपटूच्यांही पोषाखावर येणार नाव, क्रमांक

दुबई : वृत्तसंस्था

कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांचा ओढा वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर महत्त्वपूर्ण बदलाला मान्यता दिली आहे. यापुढे वन डे आणि टी-20 क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्येही खेळाडूंच्या पोशाखामागे त्यांचे नाव व क्रमांक लिहिला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात सुरू होणार्‍या अ‍ॅशेस मालिकेपासून हा बदल केला जाणार आहे.

1877 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात खेळाडूंच्या पोशाखावर नाव आणि क्रमांक टाकले होते, मात्र यानंतर आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एकच पद्धत चालत आली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या पोशाखावर नाव लिहिलेले नसल्यामुळे अनेकदा सामन्यादरम्यान त्यांना ओळखणे कठीण होऊन बसते. त्यामुळे कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांना पुन्हा खेचून आणण्यासाठी करण्यात आलेल्या शिफारसीला आयसीसीने हिरवा कंदील दाखवला आहे.

आयसीसीने कसोटी क्रिकेटला प्रेक्षकांच्या मनात स्थान देण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. दिवस-रात्र कसोटी सामना, गुलाबी चेंडूचा वापर यानंतर आता आयसीसीकडून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची घोषणाही करण्यात आली आहे. त्यातच या नवीन बदलाला मान्यता दिल्यामुळे कसोटी क्रिकेटकडे चाहत्यांची पावले वळतात का, हे पाहणे आता महत्त्वाचे

ठरणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply