Breaking News

सुषमा विद्यालयात गांधी जयंती साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त

कै. बाळाराम धर्मा पाटील शिक्षण संस्था संचालित सुषमा पाटील विद्यालय अ‍ॅण्ड ज्युनि. कॉलेज, कामोठे येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिकेकडून भव्य स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

स्वच्छ भारत, सुंदर भारत, प्लास्टिकमुक्त भारत कामोठा परिसरामध्ये जनजागृती करण्यात आली. महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर मनोजकुमार शेट्टे (मुख्य लेखाधिकारी पमपा), शहाजी भोसले (लेखाधिकारी पमपा), दिलीप पाटील (चेअरमन, सुषमा पाटील विद्यालय), उपसंचालक संघमित्रा त्रिभुवन (प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई), संगीता माने (समुपदेशक), मंदार पनवेलकर (सीईओ), संजय कटेकर, प्रीतम पाटील, अरुण कोळी, माध्यमिक विभाग मुख्याध्यापक बबन काटकर, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक प्रकाश म्हात्रे, शिक्षक, विद्यार्थ्यांसह स्वच्छतादूतही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply