Breaking News

किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादनाचे आज आयोजन

महाड : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे होत असलेल्या शिवपुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम शुक्रवार (दि. 19)  किल्ले रायगडवर आयोजित करण्यात आला आहे. यासाठी हजारो शिवभक्त उपस्थित राहणार असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती यांच्या संयुक्त वतीने चैत्र पौर्णिमा शुक्रवारी सकाळी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 339व्या शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिवादन कार्यक्रमाला नाणीजचे नरेंद्र महाराज उपस्थित राहणार आहेत. या वेळी मेघडंबरीचे शिल्पकार मनमोहन खानविलकर यांना श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, तसेच सरदार मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज दिनकरदादा पोतनीस आणि उरी सर्जिकल स्ट्राईकचे जनक लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा विषेश सत्कार करण्यात येणार आहे.

आयोजकांनी उभारलेली कमान तुटली

शिवपुण्यतिथीच्या या अभिवादन कार्यक्रमासाठी येणार्‍या नरेंद्र महाराजांच्या भक्तांनी महाड-रायगड मार्गावर नातेखिंड या ठिकाणी उभारलेली स्वागत कमान कोणातरी वाहनाच्या धडकेने तुटली आहे. सदर कमानीवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो फाटला आहे. ही घटना आयोजकांना कळवूनही त्यांच्याकडून कोणतीही दखल न घेतल्याचे दिसून येत आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply