Monday , October 2 2023
Breaking News

अतिरिक्त माती उत्खनन करणार्यांवर कारवाई

पेणमध्ये रॉयल्टी बुडविणार्‍यांचे धाबे दणाणले

पेण : प्रतिनिधी

तालुक्याच्या पूर्व भागात माती उत्खनन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून महसूल विभागाने अतिरिक्त मातीचे उत्खनन करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.

भराव व उत्खननाच्या नावाखाली ग्रामीण भागातील मोठमोठे डोंगर पोखरण्यात येत आहेत. पेण पूर्व विभागातील आराव करंबेली डोंगर भागात (गट क्र. 35/1 व 32/2) महसूल विभागाचे लक्ष नसल्याचे पाहून अतिरिक्त (945 ब्रास) मातीचे उत्खनन करण्यात आले होते. मंडल अधिकारी प्रकाश मोकल यांनी या ठिकाणी  जाऊन कारवाई केली. त्यामुळे अतिरिक्त माती उत्खनन करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत, तर काहींची रॉयल्टी भरण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. महसूल विभागाकडून अशा प्रकारची कारवाई वेळोवेळी झाल्यास महसुलात चांगलीच भर पडेल, असे बोलले जात आहे.

अतिरिक्त माती उत्खनन करणार्‍याने 30 दिवसांत नियमानुसार रॉयल्टी भरली नाही, तर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येते.

-अरुणा जाधव, तहसीलदार, पेण

Check Also

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Leave a Reply