Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांना तीन हजार मतांची आघाडी देणार

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पळस्पे विभागातून तीन हजार मतांची आघाडी देणार, असा निर्धार भाजप पळस्पे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे यांनी व्यक्त केला आहे.

ढवळे पुढे म्हणाले की, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात आली आहेत. गरजेनुसार त्या-त्या भागात कामे झाली आहेत. त्यामुळे जनता त्यांच्यावर खूष आहे. ते आपल्या मतातून कामाची पोचपावती देतील.

पळस्पे जिल्हा परिषद विभागात एकूण 17 बूथ येतात. त्यातून किमान तीन हजार मतांची आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बळावर आमदार प्रशांत ठाकूर यांना देऊ, असे ढवळे यांनी म्हटले आहे.

Check Also

चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ -मुख्यमंत्री फडणवीस

रायगड : प्रतिनिधीमहाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र …

Leave a Reply