Breaking News

उरण येथे पाच जणांना कोरोनाची लागण

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यात बुधवारी (दि. 27) पाच कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. यात करंजा येथील चार रुग्ण व ओएनजीसी येथे एक रुग्ण असून दोन स्त्रिया व तीन पुरुष असा समावेश आहे.

उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 152 झाली आहे.त्यातील 127  बरे आलेले असून त्यांना  डिस्चार्ज  देण्यात आला आहे. फक्त 25 रुग्ण उपचार घेत आहेत.त्यातील कामोठे एमजीएम रुग्णालयात चार,  पनवेल येथील (कोविड) उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे 14 व इंडिया बुल येथे सात अशे एकूण 25  कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.तसेच करंजा येथील कोरोना पॉझिटीव्ह संख्या 130 झाली होती, त्यातील 116 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून फक्त 14 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकर यांनी दिली.

Check Also

पनवेल भाजपतर्फे घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा

२५ हजारांपर्यंतची आकर्षक पारितोषिके पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर …

Leave a Reply