पनवेल ः रामप्रहर वृत्त
र ा य ग ड ि ज ल् ह्य ा त दिवाळीनंतर वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा घटू लागली असून, बुधवारी (दि. 9) नव्या 68 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, एकाचा मृत्यू ओढवला, तर दिवसभरात 127 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 36 व ग्रामीण 14) तालुक्यातील 50, पेण पाच, खालापूर व अलिबाग प्रत्येकी तीन, कर्जत व रोहा प्रत्येकी दोन, मुरूड, माणगाव व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यातील आहे. दरम्यान, नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 58,056 झाला असून, मृतांची संख्या 1614 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 55,584 जण कोरोनामुक्त झाले असून, 858 सक्रिय रुग्ण आहेत.