Sunday , September 24 2023

आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध विकासकामे

पनवेल : रामप्रहर वृत्त

उरण विधानसभा मतदारसंघाचे तत्पर आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार्‍या विविध विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 9) करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, कोन ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश म्हात्रे, सुनील गवंडी, योगेश लहाने, रवींद्र शेळके, कोळखे उपसरपंच नाझमीन पठाण, माजी सरपंच दत्तात्रय हातमोडे, खानावळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश लबडे, संतोष पारदी, वसंत हातमोडे, विष्णू ठोकल, प्रफुल झिराळे, विष्णू ठोकल, जगदिश पाटील, विशाल गायकर, जगन्नाथ हातमोडे, राजेंद्र उद्रे, नारायण पाटील, ज्ञानेश्वर दरे, सुरेश पाटील, गाव अध्यक्ष रूपेश शेळके, महेश शेंडे, सुनील चव्हाण, संभाजी पाटील, अनुज लबडे, उमेश घोडके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बुधवारी कोळखे पारपुंड गाव ते पळस्पे फाटा नदीला संरक्षण भिंत बांधणे, डेरवली येथे मूर्ती विसर्जन घाट बांधणे, खानावले येथे अंतर्गत रस्ता तयार करणे, तुरमाळे येथे सुदाम भोपी यांच्या घरापासून ते जनार्दन जाधव यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे या विकासकामांचे भूमिपूजन झाले, तसेच गुरुवार दिनांक 10 डिसेंबरला आपटा पिंपळआळी येथे अंतर्गत रस्ता तयार करणे, चावणे जलशुद्धिकरण केंद्र ते लाडिवली पाण्याच्या टाकीपर्यंत पाइपलाइन टाकणे तसेच जाताडे येथे अंतर्गत रस्ता तयार करणे या विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभा क्षेत्रात लोकांना अभिप्रेत असलेली विविध विकासकामे करून पनवेलच्या विकासाचा आलेख उंचावला. त्याचप्रमाणे उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांचासुद्धा उरण विधानसभा क्षेत्रात विकासाचा झंझावात कायम आहे.

अरुणशेठ भगत, तालुका अध्यक्ष, पनवेल

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply