Breaking News

रायगडातील 124 सरपंचपदे अनुसूचित जमातीसाठी राखीव

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील एकूण 809 ग्रामपंचायतींपैकी 33 ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी, तर 124 ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 218 सरपंचपद आरक्षित आहेत. 434 ग्रामपंचायत सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी असून, त्यातील 217 पदे महिलांसाठी राखीव आहेत.

ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तालुकानिहाय जिल्ह्यातील सरपंच व उपसरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी व महिलांसाठी आरक्षित करून संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यातील अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाच्या व्यक्तींसाठी त्या त्या जाती-जमाती व प्रवर्गीय महिलांसाठी ग्रामपंचायतीची लोकसंख्या सन 2011च्या जनगणनेनुसार निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी व सामान्य प्रशासन  उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या एकूण 809 पदांतील अनुसूचित जातीसाठी 33 ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या असून, त्यातील खुल्या प्रवर्गासाठी 16, तर  17  पदे महिलांसाठी राखीव असणार आहेत. अनुसूचित जमातीसाठी 124 पैकी खुल्या प्रवर्गासाठी 62 व  महिलांसाठी 62 पदे, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 218 पदांपैकी 109 पदे महिलांसाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी 109 पदे आरक्षित असणार आहेत, सर्वसाधारण जागांसाठी एकूण 434 पदांपैकी खुल्या प्रवर्गासाठी 217 तर महिलांसाठी 217 पदे राखीव असणार आहेत.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply