नागपूर : प्रतिनिधी
विचारवंत, पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उर्फ बाबुराव वैद्य यांचे शनिवारी (दि. 19) दुपारी 3.30च्या सुमारास वाजता नागपूर येथील स्पंदन रुग्णालयात निधन झाले. ते 97 वर्षांचे होते.
मा. गो. वैद्य यांनी 1966पासून पत्रकारिता सुरू केली होती. अनेक उत्कृष्ट लेख, अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहणार्या वैद्य यांना पत्रकारिता आणि समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारे सुगम संघ नावाचे हिंदी पुस्तकही त्यांनी लिहिले होते. संघाचं मुखपत्र असलेल्या ‘तरुण भारत’ या दैनिकाचे ते दीर्घकाळ संपादक होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली, पाच मुले असा परिवार आहे.
मा. गो. वैद्य यांची अंत्ययात्रा रविवारी (दि. 20) सकाळी 9.30 वाजता त्यांचे विद्याविहार प्रतापनगर येथील निवासस्थान येथून निघेल व अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील, असे कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …