Breaking News

महाड येथे आरपीआय (डे)ची अभिवादन सभा

पनवेल : वार्ताहर: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटीक रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची जाहीर सभा रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली महाड येथे क्रांतीदिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती.

प्रथम महाड येथील चवदार तळ्यावरील  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभेला सुरूवात करण्यात आली. . रायगड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी यापुढे गट-तट व राजकीय भूमिका विसरुन एकत्रितपणे काम केले पाहिजे व सर्वसामान्य दलित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी सांगितले.

या सभेला प्रमुख अतिथी म्हणून महाड तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव, भगवान गायकवाड, नितीन साळुंखे, नितेश साळुंखे, निलेश साळुंखे, समीर पठाण, अमिरभाई लोगडे, सुवर्णा निकम, आशा इंगळे, अमित इंगळे, योगेश शेलार, प्रशांत खैैरे, नितीन लोखंडे, मयुर जाधव, मंदार जाधव, आकेश जाधव, दिपेश जाधव, समीर मोहिते, विकी मोहिते, वर्षा साळवे, रेश्मा शिंदे, मिनल शिंदे, सुभाष शेलार, महेंद्र जाधव आदी प्रमुख पदाधिकार्‍यांसह रायगड जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते या जाहीर सभेस उपस्थित होत

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply