Breaking News

नवीन पनवेलमध्ये स्वच्छता अभियान

संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा मंत्र सांगून आपल्या जीवनात एक नवी क्रांती आणली -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : प्रतिनिधी 

भारती जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेशअण्णा टिळेकर यांचे मार्गदर्शनाखाली संत गाडगे महाराज यांच्या 64 व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी (दि. 20) सकाळी 10 वाजता  नवीन पनवेल येथील भारती जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांचे हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

महाराष्ट्रातील आधुनिक संत गाडगेबाबांनी आपल्याला स्वच्छतेचा मंत्र सांगून त्यातून  आपल्या जीवनात एक नवी क्रांती आणली. त्यामुळेच आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रात सगळीकडे स्वच्छता अभियान सुरू झालेले पाहायला मिळते, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी मनोगतामध्ये सांगितले.

या कार्यक्रमामध्ये नगरसेवक मनोज भुजबळ, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे, प्रशांत भुजबळ, राकेश भुजबळ, हेमंत भुजबळ, अजित लोंढे, भालचंद्र भुजबळ, गणेश भुजबळ, महेश भुजबळ, क्रांति चितळे, तेजस भुजबळ, संकेत डोके आणि संतोष भुजबळ आदी उपस्थित होते. तसेच आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की,  संत गाडगे महाराज यांनी माणसातील देव शोधून त्या देवाचे पूजन केले.

आपणच आपले जीवन सुधारू शकतो याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला. समाजातील अनिष्ट चाली-रिती बंद करण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. त्यांच्या नावानेच आपले शिर नतमस्तक होते, असे सांगून त्यांनी या अभियानात भाग घेतलेल्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले.

या वेळी नगरसेवक मनोज भूजबळ यांनी संत गाडगेबाबांनी स्वच्छतेसाठी आणि समाज प्रबोधनासाठी आपले आयूष्य वेचले आपल्या संपत्तीचा मालक हा समाज असेल असे सांगून तसे आपल्या इच्छा पत्रात लिहिले एवढे मोठे मन दाखवणार्‍या संताच्या शिकवणीप्रमाणे चालण्यासाठी आपल्या प्रभागात स्वच्छता आभियान सुरू राबवित असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रभाग 15 ए मधील भुजबळ उद्यानात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह सर्वांनी स्वच्छता मोहीम सुरू केली.

संत गाडेबाबांच्या स्मृतीला स्मरून आम्ही त्यांच्या पुण्यातिथीलाच नव्हे तर  वर्षभर स्वच्छतेचा अंगीकार करून आपला परिसर स्वच्छ व सुंदर  राखण त्याचा अभिमान वाटण या दृष्टीकोणातून वाटचाल करीत राहू या.

-आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष, उत्तर रायगड, भाजप

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply