नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मराठीसह देशभरातील विविध 11 भाषांमधून शेतकरी बंधू-भगिनींना पत्र लिहून सुधारित कृषी कायदे आणि त्याचे फायदे काय आहेत हे सांगितले आहे. किमान हमीभाव, बाजार समित्या आणि जमिनीचा ताबा याबाबत जी दिशाभूल केली जात आहे, भ्रम निर्माण केले जात आहेत ते दूर करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. आम्ही शेतकरी आणि त्यांच्या संघटनांशी सतत चर्चा करतो आहोत आणि त्यांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही केव्हाही तयार आहोत, मात्र शेतकर्यांच्या आडून काही राजकीय पक्ष आणि संघटना यांनी रचलेले हे कारस्थान समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे, असे तोमर यांनी म्हटले आहे. या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शेतकरी व देशवासीयांना आवाहन केले आहे.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …