Breaking News

मोफत जयपूर फूट कॅम्पचा 67 जणांना लाभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त

मोफत जयपूर फूट कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराचा लाभ घेतलेल्या 67 लाभार्थींना दि. 8 सप्टेंबर रोजी कृत्रिम अवयव प्रदान करण्यात येणार आहेत. सिडको अध्यक्ष व भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात सहभाग घेतलेल्या शिबिरार्थींची वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. या अनुषंगाने त्यांना आवश्यक असलेले कृत्रिम अवयव बसविण्यासाठी मापे घेण्यात आली. त्यानुसार हे कृत्रिम अवयव तयार होऊन दि. 8 सप्टेंबरला होणार्‍या कार्यक्रमात बसविण्यात येणार आहेत. कृत्रिम अवयव अर्थात जयपूर फूट कॅम्पचे आयोजन पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात करण्यात आले होते. या वेळी भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, कामगार नेते रवी नाईक, शहर चिटणीस अमरिश मोकल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एमपल्ले, डॉ. प्रतीक म्हात्रे, डॉ. सचिन जाधव, डॉ. संतोष आगलावे, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे कार्यालयीन सचिव अनिल कोळी, साधू वासवानी मिशनचे डॉ. मिलिंद जाधव, डॉ. तुशील ढगे, डॉ. सलील जैन व टीम, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply