Breaking News

कर्नाळा अभयारण्यात पक्षीगणना

पनवेल ः रामप्रहर वृत्त
राज्यातील पक्ष्यांसाठी पहिल्या असलेल्या कर्नाळा अभयारण्यात पक्षीगणना करण्यात आली असून, येथे 103 प्रजातींचे पक्षी असल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा आधार घेण्यात आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात एकूण किती प्रजातींचे पक्षी आहेत याची नोंद आतापर्यंत करण्यात आली नसल्याने यापूर्वी अंदाजानेच आकडेवारी सांगितली जात होती. 19 व 20 डिसेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत ग्रीन वर्क ट्रस्टच्या सहकार्याने नव्या पद्धतीने पक्षीगणना करण्यात आली. त्यामुळे अभयारण्यातील पक्ष्यांचा निश्चित आकडा समजेल.
असे असले तरी नेमका आकडा निश्चित करण्यासाठी पुढील तीन-चार वर्षे सलग तिन्ही ऋतूंमध्ये अभयारण्यात कायमस्वरूपी राहणारे व विविध ऋतूंमध्ये स्थलांतरित होऊन येणार्‍या पक्ष्यांचा अभ्यास पक्षी निरीक्षक तसेच वन अधिकार्‍यांमार्फत केला जाणार असल्याची माहिती कर्नाळा पक्षी अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply