Breaking News

अलिबागकरांनी अनुभवली शनी आणि गुरूची युती

800 वर्षांनंतरचा दुर्मीळ योग

अलिबाग ः प्रतिनिधी
सूर्यमालेतील गुरू आणि शनी हे दोन ग्रह एकमेकांच्या जवळ आले असून, तब्बल 800 वर्षांनी असा योग आला आहे. दोन ग्रहांची दुर्मीळ युती पाहण्याची संधी अलिबागकरांना मिळाली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि संविधान जागर यात्रा यांनी अलिबाग समुद्रकिनारी या आकाश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
खगोलशास्त्रज्ञ एस. नटराजन व अलिबागमधील आकाश निरीक्षक प्रा. राम जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीतून हा योग अनुभवण्यासाठी अलिबागकरांनी गर्दी केली होती. आकाश दर्शनाबरोबर खगोल विज्ञानाची आणि आकाशातील ग्रह-तार्‍यांची माहितीदेखील या वेळी उपस्थितांना देण्यात आली.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि संविधान जागर समितीमार्फत अलिबाग समुद्रकिनारी दोन दिवस शनी आणि गुरू एकाच रेषेत आल्याचा अनुभव अलिबागकरांनी अनुभवला. हे दोन ग्रह 800 वर्षांनंतर एकाच रेषेत आले आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply