पनवेल ः रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’शेतकर्यांशी संवाद’ या कार्यक्रमाचे शुक्रवारी (दि. 25) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रोजेक्टरद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या वेळी भाजप पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन जमा करण्यात आला. या योजनेतंर्गत दरवर्षी शेतकर्यांना सहा हजार रुपये थेट अनुदान दिले जाते. दोन हजार रुपयांप्रमाणे तीन वेळा ही रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा होते. या वेळी पंतप्रधान मोदींनी देशातील शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला.
या ऑनलाइन कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणावेळी पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, सांस्कृतिक सेलचे शहराध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …