पुणे ः प्रतिनिधी
राज्यातील शेतकर्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो, पण आज प्रामाणिक शेतकर्यांना ठेंगा दाखविण्याचे काम राज्य सरकार करीत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 25) केली. पुण्याच्या मांजरी बुद्रूक येथे शेतकरी संवाद यात्रेत ते बोलत होते.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून शेतकर्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना लोकांपर्यंत आणि खासकरून शेतकर्यांपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते राज्याच्या वेगवेगळ्या भागात शेतकर्यांशी संवाद साधत आहेत. या अंतर्गत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मांजरी बुद्रूक येथे शेतकरी संवाद यात्रेत सहभागी झाले. या वेळी त्यांनी नव्या कृषी कायद्यांचे समर्थन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहिलेत व कायम राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …