Breaking News

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आज पनवेलमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेल पनवेल शहरतर्फे शनिवारी (दि.२६) सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या “मनोरंजन अनलॉक @ पनवेल-संगीत नृत्य व नाटकाची मेजवानी” या कार्यक्रमाला महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या कठीण काळानंतर प्रथमच फडके नाट्यगृहामध्ये नाटकाचा व संगीताचा प्रयोग रंगत आहे. या अनुषंगाने उपाध्ये हे नाट्यरसिकांना तसेच कलाप्रेमींना भेटण्यासाठी पनवेल नगरीत येत आहेत.
भाजप सांस्कृतिक सेलचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक शैलेश गोजमगुंडे हेदेखील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना तसेच नियोजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असून, सांस्कृतिक सेलचे शहराध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सहसंयोजक गणेश जगताप, तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कंबर कसली आहे. आयोजकांचा कोरोना संदर्भातील सर्व खबरदारी बाळगून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा उद्देश आहे व त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे.
10 महिन्यांच्या मोठ्या कालखंडानंतर प्रथमच रंगमंचावर कलाविष्कार सादर होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची प्रतीक्षा सर्वच पनवेलकर करीत आहेत.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply