Breaking News

ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे यांना पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधी

भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 95 व्या जयंती दिनानिमित्त शुक्रवारी (दि.25) दै. शिवनेर आयोजित, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व आगरी दर्पण मासिकाचे संपादक दीपक म्हात्रे यांना करोना झुंजार पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, भाजप विधिमंडळ समन्वयक आमदार राज पुरोहित, महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, माजी नगरपाल जगन्नाथ हेगडे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आदी उपस्थित होते. या वेळी दैनिक व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील 25 पत्रकारांना कोरोना काळात त्यांनी बजावलेल्या विशेष कामगिरीबद्दल हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply