पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल भाजी मार्केटची तातडीने डागडुजी करून येथील विक्रेत्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील, असे आश्वासन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी मार्केटची पाहणी केल्यानंतर विक्रेत्यांशी बोलताना दिले.
शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल भाजी मार्केटला प्रभाग क्र 19च्या नगरसेविका दर्शना भोईर, राजू सोनी, मुग्धा लोंढे आणि चिन्मय समेळ यांच्यासह भेट दिली. या वेळी मार्केटचे अध्यक्ष नारायण ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांनी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचे स्वागत करून विक्रेत्यांच्या समस्या मांडल्या.
सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भाजी मार्केटची पाहणी करून विक्रेत्यांशी बोलताना तातडीने मार्केटची डागडुजी करून देण्यात येईल आणि इतर समस्याही सोडविण्यासाठी संबंधितांशी चर्चा करून त्या सोडविण्यात येतील, असे विक्रेत्यांना आश्वस्त केले.
Check Also
वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …