Thursday , March 23 2023
Breaking News

मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 2,504 मतदान केंद्र

मुंबई : प्रतिनिधी

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघात सर्वाधिक एकूण दोन हजार 504 मतदान केंद्र उभारण्यात येतील. मावळनंतर ठाणे, बारामती, रामटेक आणि बीडमध्ये सर्वाधिक मतदान केंद्र असतील.

2,452 ठाणे मतदारसंघात, 2,372 बारामती मतदारसंघात, 2,364 रामटेक मतदारसंघात आणि बीड मतदारसंघात 2,325 मतदान केंद्र उभारण्यात येतील.

10 मतदारसंघात 2,100 हून अधिक मतदान केंद्र

सातारा (2 हजार 296), शिरूर (2 हजार 296), यवतमाळ-वाशिम (2 हजार 206), चंद्रपूर (2 हजार 193), भंडारा (2 हजार 184), रायगड (2 हजार 179), परभणी (2 हजार 174), पालघर (2 हजार 170), कोल्हापूर (2 हजार 148), उस्मानाबाद (2 हजार 127) या 10 मतदारसंघात 2,100 हून अधिक मतदान केंद्र असतील. सातारा आणि शिरूर मतदारसंघात सारखेच म्हणजेच दोन हजार 296 मतदान केंद्र असणार असतील. मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 1,572 मतदान केंद्र असतील. मुंबई दक्षिण मतदारसंघात 1 हजार 578 मतदान केंद्र, मुंबई उत्तर मतदारसंघात 1 हजार 715 मतदान केंद्र असतील. उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात समान म्हणजे 1 हजार 721 मतदान केंद्र असतील. निवडणुकांसाठी एकूण 97 हजार 640 मतदान केंद्र असतील. यामध्ये ग्रामीण भागात 56 हजार 227 मतदान केंद्र असतील, तर शहरी भागात 41 हजार 413 मतदान केंद्र असतील.

Check Also

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात …

Leave a Reply