Tuesday , February 7 2023

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात बैठक

पनवेल ः वार्ताहर

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी  (दि. 24) बैठक झाली. बैठकीला पोलीस निरीक्षक शिंदे, गुप्त विभागाचे अधिकारी संजय धारेराव आदी उपस्थित होते. या वेळी विजय कादबाने यांनी सांगितले की, निवडणूक आचारसंहितेचे पालन करावे, धार्मिक मतभेद किंवा तणाव निर्माण होईल असे काम करू देऊ नये, सभेला ध्वनीक्षेपणाचा वापर करण्यासाठी आणि इतर परवानगी घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी इतर प्रभागात जाऊन प्रचार करणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी. सर्व ग्रामपंचायतींनी गावांमध्ये सीसीटीव्ही बसवून घ्यावेत. मतदाराला पैशाचे किंवा अनेक कशाचेही प्रलोभन दाखवत असतील तर तत्काळ पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, यांसारख्या सूचना देण्यात आल्या.

Check Also

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया …

Leave a Reply