Friday , March 24 2023
Breaking News

वाय. टी. देशमुख यांच्या फ्लॅटमध्ये चोरी

लाखो रुपयांंचा ऐवज लंपास, सीसीटीव्हीही पळविला

पनवेल : वार्ताहर

भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांच्या पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटी परिसरातीस अस्पायर हाईट्स या इमारतीमधील बंद फ्लॅट अज्ञात चोरट्याने फोडून फ्लॅटमधील लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चोरट्यांनी फ्लॅटमध्ये लावलेला सीसीटीव्हीही पळवून नेला आहे. या इमारतीच्या बदली वॉचमनवर संशय व्यक्त केला जात आहे. तो सध्या फरारी आहे.

वाय. टी. देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय या फ्लॅटमध्ये वास्तव्य करून असतात. चार दिवसांपूर्वी देशमुख यांच्या मातोश्रींचे गव्हाण येथील निवासस्थानी निधन झाल्याने सारे कुटुंबीय गव्हाण येथे राहण्यास गेलेले आहे. हीच संधी साधत चोरट्यांनी फ्लॅटमध्ये चोरी केली. अज्ञात इसमाने बनावट चावीद्वारे घराचा मुख्य दरवाजा उघडून आत प्रवेश केला व घरातील सोन्या-चांदीचे दागिने व इतर वस्तू मिळून लाखोचा ऐवज चोरून नेला आहे.   या घटनेची माहिती मिळताच वपोनि विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, या चोरीचे वृत्त कळताच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply