Breaking News

मतदारसंघाच्या खर्चावर केंद्रीय निरीक्षकांची नजर

अलिबाग : प्रतिनिधी

33 मावळ लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त खर्च निरीक्षक विजयकुमार चढ्ढा यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा केली, तसेच विविध नोडल अधिकार्‍यांना उमेदवारांच्या खर्चाचा काटेकोर हिशेब ठेवावा, असे निर्देश दिले.

रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण हे तीन मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात येतात. राजस्व सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांनी विविध पथकांकडून आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या माध्यमातून बल्क एसएमएस, मोठ्या प्रमाणावर रोख रकमा घेऊन जाणारे, पेट्रोल पंप्स, देशी-विदेशी दारूची वाहतूक, बँकांमधून होणारे व्यवहार यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवण्यास त्यांनी सांगितले. या वेळी पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी देखील सादरीकरण केले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply