Breaking News

आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून कुस्तीगीर संकुलासाठी भरीव मदत; सानपाडावासीयांना मिळणार मॅटवरील कुस्त्यांचा आनंद

नवी मुंबई : प्रतिनिधी

बेलापूर विधानसभा मतदारसंघातील सानपाडा नोडमध्ये सानपाडा सेक्टर 3 येथील कुस्तीगीर संकुलासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून पाच लाख रुपये मंजूर केले आहेत. आमदार मंदा म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकार्‍यांना याबाबत लेखी पत्रही दिले आहे. स्थानिक समाजसेवक पांडुरंग आमले यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे लवकरच सानपाडावासीयांना आता मातीऐवजी मॅटवरील कुस्त्यांचा आनंद घेता येणार आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सानपाडा कुस्तीगीर संकुलासाठी पाच लाखांचा निधी दिला असून आपल्या आमदार फंडातून कुस्तीसाठी मॅट व साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी पत्र दिल्याने सानपाडा व सभोवतालच्या कुस्तीप्रेमींना नववर्षाची भेट मिळाली आहे. मॅट व इतर साहित्य आमदार मंदा म्हात्रे यांनी उपलब्ध करून द्यावे यासाठी पांडुरंग आमले यांनी पाठपुरावा केला होता. कुस्तीगीर संकुलासाठी ज्या काही सुविधा लागतील तसेच कुस्तीगीरांच्या अडचणी सोडविण्यासाठी पांडुरंग आमले आमदार मंदा म्हात्रेंच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय कामकाज पाहणार आहेत. याकामी कुस्ती संघटक धनराज शेवाळे व दत्ता ठुबे यांनीही सहकार्य केल्याचे आमले यांनी या वेळी सांगितले. सानपाडा, जुईनगर, नेरूळ भागात कुस्तीप्रेमी मराठी भाषिकांची संख्या मोठी असून नववर्षाची आमदार मंदा म्हात्रेंकडून ही भेट मिळाल्याने लवकरच मॅटवरच्या कुस्त्या पाहावयास मिळणार असल्याची प्रतिक्रिया कुस्तीप्रेमींनी व्यक्त करताना आमदार मंदा म्हात्रे यांचे आभार मानले आहेत.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply