Breaking News

ग्रामपंचायत निवडणूक : उरणमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील सहा ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख बुधवारी (दि. 30) असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सहा ग्रामपंचायतींमधील उमेदवारांनी उरण तहसील कार्यालयातील निवडणूक कार्यालयात गर्दी केली होती. सहा ग्रामपंचायतींमध्ये प्रभागांची संख्या 25 असून सदस्यसंख्या 70 आहे. उरण तालुक्यातील आपल्या पक्षाचा झेंडा ग्रामपंचायतीवर फडकावा यासाठी चाणजे, महातवली, नागाव, केगाव येथील सर्वच पक्षांची नेतेमंडळी कामाला लागली आहे. या सहा ग्रामपंचायतींपैकी अनेक निवडणुका 15 जानेवारी रोजी होणार आहेत. उमेदवारांनी आपापला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरण तहसील कार्यालयात गर्दी केली होती. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी वेगवेगळा असल्याने प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकार्‍याच्या टेबलाजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. या वेळी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी इतर पदाधिकारी व कार्यकर्तेही आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे परिसरात निवडणूकमय वातावरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Check Also

पेठालीच्या मैदानात आमदार चषक 2025 स्पर्धा; भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री कृष्ण क्रिकेट संघाच्या वतीने माजी सरपंच संतोष पाटील …

Leave a Reply