Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे 22वी राज्य आणि जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा

प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; बक्षिसांच्या रकमेत वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षिणक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 22वी राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या या दिवाळी अंक स्पर्धेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती व्हावी यासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने गेल्या 21 वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून यंदाची ही 22वी स्पर्धा आहे.
नेहमीप्रमाणे यंदाही बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमधील विजेत्या प्रथम क्रमाकांस एक लाख रुपये, व्दितीय क्रमाकांस 50 हजार रुपये, तर ततीय क्रमाकांस 30 हजार रुपये तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील उत्कृष्ट कथेसाठी सात हजार रुपये, उत्कृष्ट कविता, उत्कृष्ट व्यंगचित्र, उत्कृष्ट विशेषांक व उत्कृष्ट मुखपृष्ठ यांना प्रत्येकी पाच हजार रुपये, बालसाहित्याच्या सर्वोत्कृष्ट अंकास 7500 रुपये तसेच रायगड जिल्ह्यातून प्रकाशित होणार्‍या दिवाळी अंकांसाठी खास पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये प्रथम क्रमांकास 40 हजार रुपये, व्दितीय क्रमांकास 20 हजार रुपये आणि तृतीय क्रमाकांस 10 हजार रुपये, दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी पाच हजार रुपये आणि सर्व पुरस्कारप्राप्त अंकांना सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संयोजक दीपक म्हात्रे यांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिवाळी अंकाच्या दोन प्रती 100 रुपये प्रवेश फीसह 20 नोव्हेंबर 2022पर्यंत पाठवाव्यात. दिवाळी अंक पाठविण्यासाठी व अधिक माहितीसाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, प्लॉट क्रमांक 475, मार्केट यार्ड, पनवेल, जि. रायगड. अनिल कोळी (9769409161) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply