माणगाव : प्रतिनिधी
कोल्हापूर येथील आविष्कार फाऊंडेशनने शंकर दत्ताराम शिंदे (प्राथमिक शाळा-देगाव) आणि उर्मिला शंकर शिंदे (प्राथमिक शाळा-पानोसे) या शिक्षक दाम्पत्याला राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.
आविष्कार फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी विशेष कामगिरी बजावणार्या शिक्षकांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. निराधार व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्न करणार्या शंकर शिंदे आणि उर्मिला शिंदे या शिक्षक दाम्पत्याच्या कार्याची दखल घेऊन फाऊंडेशनने त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केला आहे. कोल्हापूर येथे फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय पवार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात शिंदे दाम्पत्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी संदीप नागे व इतर आप्तेष्ट उपस्थित होते.