पनवेल ः प्रतिनिधी
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), नवीन पनवेल येथील भूगोल विभागाचे प्रा. डॉ. राजेंद्र परमार यांना नवी दिल्ली येथील बाबू जगजीवनराम कला संस्कृती व साहित्य अकादमीतर्फे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘महात्मा ज्योतिबा फुले सन्मान पदक-2020’ हा राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रा. डॉ. राजेंद्र परमार हे गेल्या 21 वर्षांपासून महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे कार्यकारी मंडळाचे सदस्य तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्हाटे यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रा. डॉ. राजेंद्र परमार यांचा यथोचित सत्कार केला. या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. के. पाटील, भूगोल विभागाचे प्रा. डॉ. दीपक नारखेडे, ग्रंथालय विभागप्रमुख प्रा. रमाकांत नवघरे व इंग्रजी विभागाचे प्रा. सूर्यकांत परकाळे उपस्थित होते.
प्रा. डॉ. राजेंद्र परमार यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाइस चेअरमन यशवंत देशमुख तसेच संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे
यांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.