Breaking News

झुंजार नेते दि. बा. पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदैव कार्यरत राहू या!  

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त
आपले नेते दि. बा. पाटीलसाहेब योद्धा बनून प्रकल्पग्रस्तांसाठी लढले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी फक्त जनतेचा विचार केला. शेतकरी, प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी सतत लढणारे झुंजार नेते दि. बा. पाटील यांचे प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदैव कार्यरत राहू या, असे आवाहन दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी येथे केले.
प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दि. बा. पाटील यांचा बुधवारी (दि. 24) सातवा स्मृतिदिन होता. त्यांना अभिवादन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते. ‘दिबा’ यांच्या पनवेल येथील संग्राम निवासस्थानी आणि आगरी समाज सभागृहात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत सर्वपक्षीय नेतेमंडळी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिवादन केले.
या वेळी दि. बा. पाटील यांच्या कार्याचा गौरव करून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोरोनाला न घाबरता दि. बा. पाटील साहेबांच्या आशीर्वादाने अन्यायाविरोधात मैदानात उतरण्याची गरज असल्याचे मत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले.  
या अभिवादन कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहर भोईर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, सुरेश पाटील, दिनेश पाटील, भूषण पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत, साई संस्थान वहाळचे संस्थापक रवी पाटील, चंद्रकांत घरत, जे. डी. तांडेल, विजय घरत, तसेच दि. बा. पाटील यांचे कुटुंबीय आदींनी ‘दिबा’ यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply