Tuesday , February 7 2023

मावळमध्ये रिपाइं(डे)चे कार्यकर्ते महायुतीत सहभागी -साळुंखे

पनवेल : वार्ताहर 

आरपीआय डेमोक्रेटिक पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी नुकतीच महाड येथे स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक लावून त्यांनी महायुतीला पाठिंबा देऊन महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराला तेथील पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मावळमध्येही लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार लवकरच सुरू करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिली.

महाड येथे झालेल्या बैठकीत तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव यांनी सांगितले, स्थानिक पातळीवर शिवसेना आम्हाला सहकार्य करून मानसन्मानाची वागणूक देते. याच्या समर्थनार्थ महाड येथील कार्यकर्त्यांना शिवसेनेशी स्थानिक पातळीवर युती करण्याची मुभा जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे यापूर्वीही लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकांत आरपीआय डेमोक्रेटिक पक्षाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर विश्वास ठेवून भाजपला पूर्ण मदत केली होती. तशीच मदत लोकसभेलाही महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिली.

Check Also

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया …

Leave a Reply