Breaking News

मालाचे पैसे न देता केली फसवणूक

पनवेल : बातमीदार

विकत घेतलेल्या मालाचे पैसे न देता नवीन पनवेल येथील एका व्यापार्‍याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी गौरी सोनी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अनिला मालपानी (49) यांचा नागझरी, तळोजा येथे अनिला एंटरप्रायजेस नावाने लोखंडी वायर बनविण्याचा कारखाना आहे. स्टील मार्केट कळंबोली येथे कारखान्यात तयार झालेला माल ठेवण्याचे गोडाऊन असून मुंबई येथील गौरव सोनी याने त्यांच्याकडून बायडिंग वायर घेतली होती. बायडिंग वायर मालपानी यांच्याकडे उपलब्ध नसल्याने ती त्यांनी अमर उद्योग, रायपूर (छत्तीसगड) येथून मागवून त्यास दिली होती. त्याबदल्यात गौरी सोनी याने 8 लाख 95 हजार 711 रुपयांचा धनादेश दिला होता. हा धनादेश बँकेत टाकला असता खात्यात बॅलन्स शिल्लक नसल्याने तो परत आला होता. याबाबत सोनी याला फोनवर विचारणा केली असता त्याने आरटीजीएस करतो, असे सांगितले, परंतु त्याने आरटीजीएस न केल्याने अनिला मालपानी त्याच्या ऑफिसमध्ये गेल्या असता त्यांना तो नाशिक येथे गेल्याचे समजले. त्यानंतर त्याने आयसीआयसीआय बँकेचे प्रत्येकी 3 लाख व 2 लाख 95 हजार 711 रुपयांचे  धनादेश दिले, परंतु हे दोन्ही धनादेशही न वटता परत आले. त्यामुळे मालपानी यांनी त्यांचे वकील कोंडीलकर यांच्यामार्फत गौरव सोनी मे. फॉर्च्युन इन्फ्रा यांना नोटीस पाठविली, परंतु सदर नोटीस त्याने स्वीकारली नाही. त्यामुळे कळंबोली पोलीस ठाण्यात गौरी सोनी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 बलात्कारप्रकरणी आरोपीला अटक

सुकापूर येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीचे अपहरण करणार्‍या आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज पगारे (विठ्ठलवाडी, चिंचपाडा) असे आरोपीचे नाव आहे. सुकापूर येथे राहणार्‍या 16 वर्षीय तरुणीला 25 मार्च रोजी आरोपी सुरज पगारेने फूस लावून पळवून नेले होते. त्यामुळे तिचे अपहरण झाल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक संदीप माने, पोलीस हवालदार विजय यादव, पोलीस शिपाई महेश अहिरे व महिला पोलीस शिपाई उषा जामनकर यांना मोबाइल व गुप्त बातमीदारामार्फत आरोपी अमरावती येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. पीडित तरुणीला आईवडिलांच्या ताब्यात दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पाच लाखांच्या डम्परची चोरी

तालुक्यातील विठ्ठलवाडी, चिंचपाडा येथे पार्क करून ठेवलेल्या पाच लाख रुपये किमतीच्या डम्परची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. सुभान इनामदार (बेलापूर) यांनी डम्पर (क्र. इमएच 06 एसी 9777) विठ्ठल मंदिर चिंचपाडा येथे पार्क केला होता. शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply