उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण तालुक्यातील कळंबूसरेच्या अद्यावत नूतन ग्रामपंचायत कार्यालयच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा रविवारी (दि. 10) उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंटकचे राष्ट्रीय नेते महेंद्र घरत हे होते. आमदार महेश बालदी या वेळी म्हणाले की, गावचे नाव उच्च पातळीवर न्यायचे असेल तर गावच्या विकास कामांबरोबर गावचे ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत अद्यावत आणि सुसज्ज असणे गरजेचे आहे. या अद्यावत आणि सुसज्ज इमारतीचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे, याचा आम्हा लोकप्रतिनिधीना अभिमान वाटत आहे. तसेच कळंबुसरे गावच्या सरपंच नूतन कुळदिप नाईक यांनी आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून या अगोदरही अंगणवाडी, मूख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पाण्याची व्यवस्था, गटारे, समाजमंदिर अशा प्रकारची अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत, अशा कळंबुसरे गावचा, ग्रामपंचायतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने कार्यरत राहिले तर निश्चितच गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असेही आमदार बालदी यांनी या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे औचित्य साधून नमूद केले. या वेळी जिल्हा परीषद सदस्य बाजीराव परदेशी, उरण नगरपालिकेचे शिक्षण सभापती तथा भाजपचे तालुकाध्यक्ष रवी भोईर, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गांवड, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, पंचायत समिती उपसभापती शुभांगी पाटील, सरपंच नूतन नाईक, उपसरपंच सुनिल पाटील माजी सरपंच रामदास जाधव, सदस्य उमेश भोईर, महेश राऊत, भाजप तालुका सरचिटणीस कुलदीप नाईक, विभाग अध्यक्ष शशिकांत पाटील, गावध्यक्ष राजेश पाटिल, सदस्य दीपक पाटील, सुजाता जाधव, सरिता नाईक, तारामती नाईक, मोहिनी राऊत, सुषमा पाटील, माजी उपसरपंच रवींद्र पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र पाटील, काशीनाथ पाटील, गोपीनाथ पाटील, युवा नेते सुशांत पाटील, ग्रामसेविका शामल मोकळ, तालुका सदस्य रूपेश पाटील, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कळंबुसरे गावातील गटारांची समस्या आहे व इतर विकासाची कामे आहेत. त्यासाठी मी आमदार निधीतून दरवर्षी 10 लाख रुपये देईन. ते सुद्धा तीन वर्षे म्हणजे एकूण 30 लाख रुपये देईन. तसेच इतर विकास कामांसाठी मी सहकार्य करेन असे मी जबाबदारीने सांगतो.
-आमदार महेश बालदी