नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि समालोचक रिकी पाँटिंगला भारतीय चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अनेक नेटकर्यांनी पाँटिंगच्या वक्तव्यानंतर त्याला ट्रोल करीत टीकास्त्र सोडले. यामध्ये भारताचे माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि वासिम जाफर यांचाही समावेश आहे. चौथ्या डावात भारतीय फलंदाज 200 धावाही करू शकणार नाही, असे वक्तव्य पाँटिंगने केले होते.
सिडनी कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाच्या खेळानंतर ‘अस्क रिकी’ अंतर्गत एका युजर्सने भारतीय संघ पाचव्या दिवशी किती धावसंख्येपर्यंत पोहचेल, असा प्रश्न रिकी पाँटिंगला विचारला होता. त्यावर बोलताना पाँटिंग म्हणला की, पाचव्या दिवशी भारतीय संघाला 200 धावाही करता येणार नाहीत.
प्रत्यक्षात पाचव्या दिवशी ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने सामन्यात रोमांच निर्माण केला. पुजाराने 74, तर पंतने 97 धावांची खेळी केली आणि भारतीय संघाने 275 धावांचा टप्पाही ओलांडला आहे. भारतीय संघाने धावांचे द्विशतक पार केल्यानंतर नेटकर्यांनी पाँटिंगला ट्रोल केले.
भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही एक फोटो पोस्ट करत पाँटिंगला ट्रोल केले आहे. म्हणतात ना एक फोटो परिस्थिती बोलून दाखवतो.. तशीच अवस्था या फोटोमधून पाँटिंगची दिसून येत आहे, असे म्हणत सेगवागने पंतसोबतचा पाँटिंगचा एक फोटो पोस्ट केला आहे. आयपीएलदरम्यानचा हा फोटो आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पाँटिंग हा दिल्लीच्या संघाचा कोच असून, तो सध्या चॅनल 7वर समालोचनाची जबाबदारी बजावत आहे.
सेहवागशिवाय माजी क्रिकेटपटू वासिम जाफरनेही आपल्या खास शैलीत पाँटिंगला ट्रोल केले. ट्विट डिलीट करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे जाफरने म्हटले आहे.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …