Breaking News

नवीन पनवेलमध्ये फूटपाथच्या नवीन कामाला सुरुवात

नगरसेविका सुशिला घरत, माजी नगराध्यक्ष संदिप पाटील यांच्या प्रयत्नांचा यश

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल मधील अभ्युदय बँक ते आयप्पा मंदिरा लगत असणारा फूटपाथ डागडुजी ऐवजी नवीन करण्यात यावा, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेतील प्रभाग ’ड’ समिती सभापती भाजपच्या नगरसेविका सुशिला जगदिश घरत व माजी नगराध्यक्ष संदिप पाटील यांनी सिडकोकडे केली होती, त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून त्या अनुषंगाने सिडकोने या कामाला सुरुवात केली आहे.

या वेळी नगरसेविका सुशिला घरत, माजी नगराध्यक्ष संदिप पाटील, जगदिश घरत, प्रशांत आवळे, तुषार भगत, काशिनाथ पाटील, शिवनाथ पन्हाळे आदी उपस्थित होते.

अभ्युदय बँक ते आयप्पा मंदिरा लगत असणारा फूटपाथ डागडुजी ऐवजी नवीन करण्यात यावा अशी मागणी नगरसेविका सुशिला घरत व माजी नगराध्यक्ष संदिप पाटील यांनी करून संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली होती. व ते काम लवकरात लवकर करण्याची आग्रही मागणी केली होती.  

नवीन पनवेल हद्दीतील प्रभाग 17  मधील अभ्युदय बँक सेक्टर 17, 14 आणि सेक्टर 13 मधील आयप्पा मंदिरा लगत असणार्‍या फूटपाथ आणि त्या खालील गटारांची परिस्थिती चिंताजनक झाले असतानाही या फूटपाथवर काम करत असलेले कर्मचारी तिथे काँक्रिट व ब्लॉक टाकून तात्पुरती डागडुजी करत होते. त्यामुळे तेथील गटारांचा गाळ तसाच राहून नागरिकांना नाहक त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे फूटपाथची व गटाराचे व्यवस्थित गाळ काढून नवीन काँक्रीटीकरण करण्यावर नगरसेविका सुशिला घरत व संदीप पाटील यांनी लक्ष केंद्रित केले. या संदर्भात त्यांनी सिडकोच्या अधिकार्‍यांना या समस्येवर लवकरात लवकर कार्यवाही करून नागरिकांना या समस्येतून मुक्त करावे, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार या कामाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. त्याबद्दल नागरिकांकडून नगरसेविका सुशिला घरत व माजी नगराध्यक्ष संदिप पाटील यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

Check Also

विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करून जनतेची …

Leave a Reply