अहमदाबाद : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 17) गुजरातच्या केवाडिया येथील ’स्टॅच्यू ऑफ युनिटी’शी जोडणार्या आठ रेल्वेंना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वे वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई व प्रतापनगरशी जोडल्या जाणार आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाला एक भारत, श्रेष्ठ भारत हा मंत्र देणार्या सरदार पटेलांच्या सर्वांत उंच प्रतिमेमुळे या जागेची ओळख बनली आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीहून अधिक लोक येथे येत आहेत.