Breaking News

दोन महिन्यांसाठी खोल समुद्रात मासेमारी बंदी

अलिबाग ः प्रतिनिधी

 येत्या 1 जून ते 31 जुलै या कालावधीत यंत्रिकी नौकांद्वारे खोल समुद्रात मासेमारी करण्यास शासनाने बंदी घातली आहे. पावसाळ्यात खोल समुद्रात मुसळधार लाटा आणि वारा सुरू असतो, तसेच याच काळात सुरुवातीच्या महिन्यात समुद्री मासे प्रजनन करतात. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांसाठी सागरी किनार्‍यापासून 12 सागरी मैलापर्यंत  खोल समुद्रातील यांत्रिकी मासेमारीवर बंदी घालण्यात येते.

त्यानुसार या कालावधीत मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी यांत्रिक मासेमारी नौकांसाठी आहे. पारंपरिक पध्दतीने मासेमारी करणार्‍या बिगर यांत्रिकी नौकांसाठी ही बंदी लागू नाही, असे मत्स्य विभागाने प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 1 ऑगस्टपासून मासेमारीला पुन्हा सुरुवात करण्यात येईल.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply